बजरंग दलाकडून पोलीस निरीक्षकांचा सत्कार
| मुरुड- जंजिरा | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील विहुर येथील अझर जावेद वाळवटकर याने घराच्या मागील बाजूस पाळीव प्राणी यांची कत्तल केली असल्याची खबर मुरुड पोलिसांना लागताच पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली.
दरम्यान, आरोपीच्या घराच्या मागील बाजूची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांना काही पाळीव प्राण्यांचे अवशेष दिसून आले. क्षणाचा विलंब न जाता आरोपी वाळवटकर याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी त्वरित दखल घेऊन आरोपीस अटक केल्याबद्दल बजरंग दल यांच्याकडून सत्कार करण्यात आला. यावेळी बजरंग दल संयोजक अक्षय अरुण महाडिक, सहसंयोजक ओमकार संदीप उमरोठकर, सहसंयोजक मानतेश मंगेश जासूद, मंत्री महेश घाग, सहमंत्री प्रकाश विश्राम शिंदे, कार्यकर्ता विश्वास म्हात्रे आदी उपस्थित होते.
