मटका जुगार प्रकरणी आरोपीवर गुन्हा

। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव तालुक्यातील इंदापूर गावात एसटी स्टँडच्या मागे एका अशोकाच्या झाडाखाली मटका जुगाराचा खेळ खेळविताना मिळून आल्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची फिर्याद अनिल नारायण मोरे (वय-31) पोलीस नाईक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.
सदर गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी कि, गुन्ह्यातील आरोपी पंकज विजय पतंगे (वय-36) रा.इंदापूर शिवाजी चौक ता.माणगाव हा विनापरवाना गैरकायदा मटका जुगाराचे साहित्य एकूण रक्कम 4862 रुपये ताबे कब्ज्यात बाळगून मटका जुगार खेळ खेळवीत असताना मिळून आला. या गुन्ह्याप्रकरणी आरोपीवर माणगाव पोलीस ठाण्यात कॉ.गु.रजि.नं.97/2022 महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक आर.पी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रावसाहेब कोळेकर हे करीत आहेत.

Exit mobile version