विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक

| पालघर | प्रतिनिधी |

भाईंदर पूर्वेला एका 23 वर्षीय तरुणीला कामावरून घरी येत असताना भररस्त्यात मिठी मारून तिच्यावर ब्लेडने वार व लाथा बुक्याने मारहाण करण्याची घटना घडली होती. पीडीत तरूणीला गंभीर दुखापत करून आरोपी पळून गेला होता. त्याला काशीमिरा गुन्हे शाखा युनिट -1 ने बोरिवली येथून अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

दिपक गोविंद माळी (बोरिवली) असे या आरोपीचे नाव आहे. 23 जुलै रोजी पीडित तरुणी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या कामावरून घरी जात असताना एका तरुणाने तिचा पाठलाग करून पाठीमागून मिठी मारत बळजबरी केली. तेव्हा घाबरलेल्या पीडित तरुणीने त्याला विरोध केला असता तरुणीच्या डाव्या हातावर ब्लेड मारून ठोशाबुक्यांनी मारहाण केली व त्यानंतर आरोपी त्या जागेवरून पळून गेला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांनी आरोपीला तातडीने अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यावरून या गुन्ह्याचा तपास नवघर पोलीस ठाणे सोबतच त्याचा समांतर तपास काशीमिरा गुन्हे शाखा युनिट 1 यांनी तपास करून आरोपीला बोरीवली येथून अटक केली आहे.

Exit mobile version