भाजपचे बंडखोर दिलीप भोईर सहा वर्षांसाठी निलंबित; खासदार धैर्यशील पाटील यांची माहिती
| रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग- मुरुड- रोहा विधानसभा मतदार संघात महायुतीच्या अधिकृत उमेदवाराविरोधात भारतीय जनता पार्टीचे बंडखोर दिलीप भोईर यांनी निवडणूक रिंगणात उमेदवारीअर्ज कायम ठेवला. यामुळे पक्षविरोधी कारवाईकेल्याचा ठपका ठेवून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांच्यासूचनेनुसार भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष आणि अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष दिलीप भोईर यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती रायगड जिल्हाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. अलिबाग गोंधळपाडा नजीकच्या वृंदावन सोसायटी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये खासदार धैर्यशील पाटील यांनी पत्रकांबरोबर संवाद साधला. यावेळी सतीश धारप, अॅड. महेश मोहिते , मिलिंद पाटील, उदय काठे, गिरीश तुळपुळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आणि अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष दिलीप भोईर यांनी विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. महायुतीच्या धोरणानुसार अधिकृत उमेदवार असतानाहीउमेदवारी अर्ज भरल्याने त्यांना वरिष्ठ नेत्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. परंतु उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दिलीप भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवून पक्षाच्या धोरणाविरोधात कारवाई केल्याने त्यांना भारतीय जनता पार्टीमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्यासमवेत असणार्या भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील याबाबतचीसमाज देण्यात आली आहे. तूर्तास दिलीप भोईर यांच्यावरचनिलंबनाची कारवाई कार्नाय्त आली असून कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबतराहून काम केल्यास पक्षाला कटू निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई कारवाई लागेल असे स्पष्ट मत खासदार धैर्यशील पाटील यांनी मांडले.
अलिबाग विधानसभा मतदार संघात तयार झालेली परिस्थिती 2019च्या निवडणुकीत उरण मतदार संघात तयार झाली होती. त्यावेळी भरतोयजनता पार्टीने महेश बालदी यांच्यावर कोणतीच कारवाई केली नव्हती. कारण त्यांच्या पाठीवर भाजपच्या बड्या नेत्याचा वरदहस्त होता. दिलीप भोईर यांनी देखील भाजप वाढविण्यासाठी आकाश पातळ एक करून आमदारकी लढविण्याचे स्वप्न पहिले आणि उमेदवारी अर्ज भरला. परंतु बड्या नेत्याचा वरदहस्त नसल्याने त्यांच्यावर भाजपने निलंबनाची कारवाई केली असल्याची चर्चा मतदारसंघात ऐकू येत आहे.
सत्तेची गणिते काबीज करण्यासाठी शिंदे शिवसेना , अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आणि भारतीय जनता पार्टी यांनी महायुती साकारली. या महायुतीला रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड विधानसभा मतदार संघात सुरुंग लागला आहे. महेंद्र दळवी यांना महायुतीने अधिकृत उमेदवारी दिली परंतु भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर यांनी आमदारकी लढविण्याचा हट्ट कायम ठेवला. उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी दिलीप भोईर निवडणुकीतून माघार घेतीलयासाठी महेंद्र दळवी यांनी फिल्डिंगलावली होती परंतु त्यांना त्यात यश आले नाही. दिलीप भोईर निवडणूक रिंगणात असल्याने महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यांनी वरिष्ठांच्या मदतीने भाजपच्या दिलीप भोईर यांच्यावर पक्षाने कारवाई करण्यासाठी देव पाण्यात बुडवले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. पक्षीय धोरणाविरोधात राजकीय हालचाली केल्याने दिलीप भोईर यांच्यावर पक्षाने निलंबनाची कारवाई केली आहे.
दिलीप भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना केलेल्या शक्ती प्रदर्शनाने महायुतीच्या नेत्यांची धडधड वाढवली होती. भाजप उरण पॅटर्न राबविण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत होते. यामुळे दिलीप भोईर यांच्यावर निवडणुकीपूर्वी कारवाई होणार नाही असे चित्र होते. परंतु शक्तिप्रदर्शनावेळीजमलेलीगर्दी पाहून महेंद्र दळवी यांनी आपल्या प्रचाराची वाट वाकडी करून त्यांनी दिलीप भोईर यांना टार्गेट केले आणि त्यात ते जिंकले. दिलीप भोईर यांच्यावर भारतीय जनता पार्टीने कारवाई केली असली तरी विधानसभा निवडणुकीमध्ये निश्चितपणे दिलीप भोईर आता महेंद्र दळवी यांना राजकीय शत्रू मानून त्यांच्या विरोधात मतदारसंघात रान पेटवत यात तिळमात्र शंका नाही. यामुळे शिंदे गटाच्या मतदारांना महेंद्र दळवी यांना आपलेसे करण्यासाठी नव्या क्लुप्त्या शोधाव्या लागणार आहेत.