। माणगाव । प्रतिनिधी ।
लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 14 वर्षे कारावासाची शिक्षा माणगाव येथील जिल्हा अतिरिक्त न्यायालयाने ठोठावली आहे. ही घटना दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 20 फेब्रुवारी 2015 रोजी घडली आहे. आरोपीत याने पिडीत मुलगी हि आपली नातेवाईक आहे हे माहित असून सुद्धा तिचे अज्ञान पणाचा फायदा घेवून राहते घरी बोलावून अतिप्रसंग केला व सदरची घटना कोणास सांगितली तर घरच्याना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सदर पिडीत मुलीला अश्लिल फोटो व सीडी सापडल्याचे लिहून घेऊन मानसिक त्रास दिला. गुन्ह्याचा तपास एस.एन.मोगले, सहा. पोलिस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे यांनी तपास करून सदरचे दोषारोप पत्र मा. विशेष न्यायालय, माणगाव-रायगड येथे झाली व सदर गुन्ह्यात पिडीत मुलीची साक्ष व वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला. सदर खटल्यामध्ये सहा.सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पहिले व कोर्टासमोर प्रभावीपणे युवि-तवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान पेरवी अधिकारी यु.एल.धुमास्कर, पोलीस उपनिरीक्षक, महिला पोलिस हवालदार छाया कोपनर, पो.ह. शशिकांत कासार, व शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. मा.विशेष व सत्र न्यायाधीश प्रिया बनकर यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपी यांस दोषी ठरवून ता. 4 मे 2022 रोजी भा.द.वि.सं. कलम 376(आय) 506 सह पोव-सो कलम 6 या सर्व कलमान्वये दोषी धरून 14 वर्षाची सव-तमजूरी व रू. 1,00,000, दंडाची शिक्षा सुनावली.






