। अहमदनगर । प्रतिनिधी ।
अहमदनगर जिल्ह्यात पतीनेच पत्नीवर ऍसिड टाकून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडलीआहे. विभक्त झाल्याच्या रागातून पतीने हे कृत्य केले असून या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पाथर्डी तालुक्यातील नाथनगर येथे दुपारी बारा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. भाळवणकर पती-पत्नी हे गेल्या सहा महिन्यांपासून विभक्त राहत होते. याच रागातून पती निलेश पांडव याने आपल्या पत्नीच्या अंगावर ॲसिड टाकून तिला गंभीर जखमी केले. तिच्यावर पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून तात्काळ ताब्यात घेतले.