पनवेल पालिकेची 5 दुकाने, 3 हॉटेल्सवर कारवाई

| पनवेल | वार्ताहर |
नवेल कार्यक्षेत्रातील खारघर, पनवेल, कामोठे, कळंबोली, तळोजा, नवीन पनवेल अशा सर्व नोडमध्ये काही हॉटेल्स, दुकाने रात्री उशीरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत. पालिकेने लॉकडाऊनचे नियम पाळण्याविषयीच्या सूचना वारंवार देऊनही काही हॉटेल व्यवसायिक, दुकानदार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे प्रशासनाच्या निर्दशनास आल्याने अधिकारी आणि प्रभाग अधिकारी यांनी 5 दुकाने व 13 हॉटेल्सवर कारवाई केली.

नुकत्याच झालेल्या एका बैठकीत प्रभाग अधिकार्‍यांना आयुक्त गणेश देशमुख यांनी नियमानुसार दिलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ सुरू असणारी दुकाने व हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार खारघर येथील कोपरा हायवे ब्रेक हॉटेल, शिवव्हेज हॉटेल, कळंबोली येथील ओसिस, हॉटेल गाजेबो,पनवेल मधील सॉल्ट एन पेपर, हॉटेल आमंत्रण, वामन अमृततुल्य, हॉटेल दिपा, हॉटेल जय मल्हार, हॉटेल महालक्ष्मी, कामोठे येथील तवा हॉटेल, मानसरोवर हॉटेल, चायना सिटी यांच्यावर कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा प्रादुर्भाव पूर्णपणे रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले असून अत्यावश्यक सेवेशिवाय इतर दुकांने दुपारी चार नंतर सुरू असल्याचे निर्दशनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी अधिकारी व प्रभाग अधिकारी यांना दिले आहे. तसेच हॉटेल्सनी देखील दिलेले नियम पाळावे अशा सूचना केल्या आहेत.

Exit mobile version