नियम मोडणार्‍या वाहनचालकांवर कारवाई

| पनवेल | वार्ताहर |
केंद्र सरकारने मोटर वाहन कायद्यात बदल करून नवीन कायदा आणला आहे. या कायद्यातील तरतुदींमुळे दंडाच्या रकमेत वाढ केली. त्यामुळे पनवेल परिसरातील 2734 वाहनचालकांना वाहतूक नियमांचे उल्लघन महागात पडले आहे.

वाहतुकीचे नियम मोडणार्‍या बेशिस्त वाहन चालकांना जरब बसवण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहनने कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यात केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार झालेल्या वाहतुकीच्या नियमांमधील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे नवीन कायद्यानुसार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचे प्रमाण वाढले आहे. एप्रिल 2021 ते डिसेंबर 2021 या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये पनवेलमध्ये 2,350 एवढ्या विक्रमी वाहन परवाने निलंबित करण्यात आले होते. तर 2022 मध्ये पनवेल प्रादेशिक परिवहनने 2,734 वाहन परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये सिग्नल जंप-1354, मोबाईल टॉकिंग -431, ड्रिंक अँड ड्राइव्ह -32, ओवर स्पीड-735, विना हेल्मेट -182 यांचा समावेश आहे.

दरम्यान, वाहनचालक परवाना काढण्यासाठी पनवेल प्रादेशिक परिवहनकडे धाव घेतली आहे. त्यामुळे नवीन परवाने काढण्यासाठी आगाऊ स्लॉट बुक केले जात आहेत. त्यामुळे पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयात सध्या वाहन परवाना काढण्यासाठी नागरिकांची गर्दी होताना दिसत असून चालकांनी कारवाईचा धसका घेतला आहे.

राज्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासोबत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक पोलीस, आरटीओमार्फत ही कारवाई केली जात आहे. – गजानन ठोंबरे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

Exit mobile version