काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍यांवर कारवाई

। श्रीनगर । वृत्तसंस्था ।
जम्मू काश्मीरमध्ये यापुढे दगडफेकीत सहभागी होणार्‍यांना आणि दंगेखोरांना पासपोर्ट तसंच सरकारी नोकरी मिळणार नाही, याची खबरदारी घेण्यात आलीय.जम्मू काश्मीर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, दगडफेक तसंच धोकादायक कृत्यांत सहभागी होणार्‍यांना पासपोर्ट आणि सरकारी नोकरीसाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र मिळणार नाही.

पासपोर्ट, सरकारी नोकरी तसंच इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी पडताळणी दरम्यान व्यक्तीला कायदे-व्यवस्था उल्लंघन, दगडफेक प्रकरण तसंच राज्यात सुरक्षा दलांविरोधात इतर गुन्हेगारी स्वरुपातील कृत्यात सहभागाची विशेष चौकशी करण्याचे आदेश याद्वारे देण्यात आले आहेत.स्थानिक पोलीसत स्टेशनमध्ये उपलब्ध असलेल्या रेकॉर्डशी अशा प्रकरणांची पडताळणी करावी, असेही आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यासाठी व्यक्तीच्या पडताळणीसाठी पोलीस, सुरक्षादल आणि इतर सुरक्षा यंत्रणेजवळ उपस्थित असलेले डिजिटल पुरावे उदाहरणार्थ सीसीटीव्ही फुटेज, फोटो, व्हिडिओ तसंच ऑडिओ क्लीपचीही मदत घेण्यात येणार आहे.पडताळणीत एखादा व्यक्ती दगडफेक किंवा दंगेखोरीत सहभागी आढळलातर त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जावा, असेही आदेश देण्यात आले आहेत.

Exit mobile version