नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, यासाठी रॅली, शाळा, महाविद्यालयात चर्चासत्रे, रस्ता सुरक्षेतून जनजागृती केली जाते. असे असतानादेखील नियमांचे उल्लंघन होत असल्याने महिनाभरात 71 हजार 651 जणांवर कारवाई केली आहे. पनवेलसह नवी मुंबई, उरण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. वाढत्या वाहनांमुळे आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अशा वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरी भागात दुचाकीवरून तीन ते चार सीट प्रवास करणे, रिक्षांमधून पुढच्या सीटवर प्रवासी बसवणे, विद्यार्थी वाहनातून विद्यार्थ्यांना कोंबणे, हेल्मेट परिधान न करणे, सिग्नल यंत्रणेकडे दुर्लक्ष, सीट बेल्टचा वापर न करणे, विनापरवाना वाहन चालविणे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खारघरची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक आहे. दरवर्षी शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, वाहतूक पोलीस चौकीत वाहतूक पोलिसांचे संख्या बळ कमी असतानाही 5 हजार 128 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.

Exit mobile version