अनाधिकृत झोपड्यांवर कारवाई

| पनवेल | प्रतिनिधी |

खारघर सेक्टर 36 येथे अनाधिकृत बांधकाम वाढले होते. यामध्ये साधारणपणे 35 झोपड्यांचे बांधकाम झाले होते. यावर बुधवारी (दि.29) रोजी दुपारी तीनच्या सुमारास मनोज घोडे पाटील, उपजिल्हाधिकारी व नियंत्रक अनाधिकृत बांधकाम यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 35 झोपड्या पाडण्यात आल्या. या कामी एक जेसीबी, दोन ट्रक, तीन जीप, एक सुपरवायझर, 10 लेबर पोलीस आणि सुरक्षा सुरक्षा कर्मचारी यांच्यावतीने तोडक कारवाई करण्यात आली.

याबाबत सिडकोचे उपजिल्हाधिकारी व नियंत्रक अनधिकृत बांधकाम मनोज घोडे पाटील यांनी सांगितले की, खारघर हे शैक्षणिक आहे. तसेच हे शहर सुशिक्षित लोकांचे आहे. सध्या सिडकोने अनाधिकृत झोपड्यांवर, तसेच रस्त्यावर असणार्‍या नर्सरीच्या नावाखाली ठाण मांडून बसलेल्या अनधिकृत नर्सरीच्या विरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. त्याचबरोबर आम्ही एखाद्या अतिक्रमनावर कारवाई केल्यानंतर, त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याकडे आम्ही जास्त लक्ष देत आहोत.

Exit mobile version