| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर येथील मुंबई-पुणे मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाकडून कारवाई केली जात असल्यामुळे अवैध वाहतूक चालकांचे धाबे दणाणले आहे.
पुणे-मुंबई मार्गावर खासगी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक होते. खारघर परिसरातून पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगलीकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक खारघर येथील हिरानंदानी बसथांब्यावर वाहने उभी करतात. सायंकाळनंतर या गाड्या निघत असल्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असते. त्यामुळे खारघर वाहतूक शाखेकडून अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांकडून दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.






