। पनवेल । प्रतिनिधी ।
बेकायदेशीररित्या गांजा जवळ बाळगून त्याची विक्री केल्याप्रकरणी एका महिलेला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच, तिच्याकडून जवळपास 9 हजार रुपये किंमतीचा गांजा हस्तगत केला आहे.
अजिवली गाव परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये तसेच किराणा दुकानात एक महिला बेकायदेशीरित्या गांजा विक्रीसाठी ठेवत असल्याची माहिती वपोनि गजानन घाडगे यांना मिळली. माहितीनीसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कांबळे, सपोनि अनिरुद्ध गिजे, पो.उपनिरीक्षक हर्षल राजपूत, अभिजीत व्हरांबळे, पो.हवा. दीपक शेळके, पोहवा देवरे, धुमाळ, कुदळे, तांडेल, बाबर, म्हारसे, पवार, मपोहवा रोडगे, पोहवा पाटील, पोशि भगत आदींच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी त्या ठिकाणावरुन महिलेला ताब्यात घेत जवळपास 9 हजार रुपये किंमतीचा गांजा हस्तगत करण्यात आला आहे.





