उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कार्यवाही सुरू

विजय हजारे यांचे उपोषण स्थगित

| कर्जत | प्रतिनिधी |

कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी दि.16 डिसेंबर रोजी आमरण उपोषणाला सुरूवात केली होती. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी (दि.18) उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार नविन अनधिकृत बांधकामांपैकी एका बांधकामावर सायंकाळच्या सुमारास प्रशासन स्तरावरून कार्यवाही करण्यात आली. त्याचबरोबर अधिकारीवर्गाकडून इतर मांगण्यांसंदर्भातील देण्यात आलेल्या लेखी आश्वासनानुसार रात्री उपोषणकर्ते विजय हजारे यांनी त्यांचे उपोषण तुर्तास स्थगीत केले आहे. तसेच, लेखी लेखी आश्वासनानुसार कार्यवाही न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचीका दाखल करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

कर्जत तालुक्यातील कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ-कळंब राज्यमार्ग, नेरळ-कशेळे राज्यमार्ग, नेरळ प्रमुख जिल्हामार्गाच्या रस्त्यालगत, तसेच नेरळ संकुल विकास प्राधिकरण क्षेत्रातील धामोते, बोपेले, कोल्हारे शासकिय जागेतील अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामांवर कार्यवाही करण्यासंदर्भात कोल्हारे ग्रामपंचायत सदस्य विजय हजारे यांचा 2017 पासून शासन प्रशासन दरबारी लढा सुरू आहे. मात्र, शासन व प्रशासन स्तरावरून देण्यात आलेल्या लेखी आश्वासनाची पूर्ती होत नसल्याने, विजय हजारे हे 16 डिसेंबर रोजी नेरळ साई मंदिर चौक येथे आमरण उपोषणाला बसले. यावेळी त्यांनी शासकीय जमिनीवरील सर्व अतिक्रमण अनाधिकृत बांधकामे काढुण टाकणे, नेरळ ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या राजिप वाणिज्य संकुल व विश्रामगृह इमारत खुली करण्यात यावी. तसेच, या इमारतीतील गाळ्यांचे उद्घाटन होऊन चार वर्षे झाली तरी गाळे वाटप का करण्यात आले नसून ते त्वरीत करावेत, या मागण्यांसह एकूण 12 मागण्यांसाठी विजय हजारे हे उपोषणाला बसले होते.

उपोषणाचे तिसऱ्या दिवशी गुरूवारी सायंकाळी संबधित विभागाच्या अधिकारीवर्गाकडून ज्या सात नविन अनधिकृत बांधकामांना नोटीस पाठविण्यात आल्या होत्या त्यापैकी एक बांधकाम तोडण्याच्या कार्यवाहीला सुरवात करण्यात आली. दरम्यान, बांधकाम धारकांकडून होणाऱ्या विरोधामुळे हे बांधकाम जमिनदोस्त करण्यास विलंब झाल्याने उर्वरीत सहा बांधकामांवर येत्या दोन ते तिन दिवसांमध्ये कार्यवाही केली जाणार आहे. तरी उर्वरीत 11 मागण्यांसंदर्भातील कार्यवाही पुढील एक महिन्याच्या कालावधीत केली जाण्याचे लेखी आश्वासन उपस्थित अधिकारीवर्गाकडून उपोषणकर्ते विजय हजारे यांना देण्यात आले. त्यामुळे त्यांनी रात्री 9 वाजताच्या सुमारास आपले उपोषण तुर्तास स्थगित केले आहे. त्यामुळे पुर्वी दिलेल्या आश्वासनासारखेच आता दिलेल्या लेखी आश्वासनावर एक महिन्याच्या कालावधीत कार्यवाही झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल करू, असा इशारा विजय हजारे यांनी दिला आहे.

या आहेत मागण्या
राज्यमार्गालगत तसेच शासकीय जमिनीवरील सर्व अतिक्रमण व अनाधिकृत बांधकामे काढुण टाकणे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या राजिप वाणिज्य संकुल व विश्रामगृह इमारत खुली करण्यात यावी. तसेच, या इमारतीतील गाळ्यांचे उद्घाटन होऊन चार वर्षे झाली तरी गाळे वाटप का करण्यात आले नाहीत? ते वाटप त्वरीत करावे. धामोते येथील अनाधिकृत ईमारतीमध्ये सुरु असलेल्या शाळेची चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. सिलवेक्स रियालिटि प्रा. लि.ची थकित घरपट्टी वसुल करावी. कोल्हारे सरपंचांनी पदाचा दुरुपयोग करुन बांधकाम नाहरकत दाखले दिले, त्यांनी बिल्डिंगला पुर्णत्वाचा दाखला दिला, 18 जुलै 2016 च्या शासन निर्णयचा आधार घेऊन दुसऱ्यांच्या जागेत मनमानी करुन कर आकारणी केली, याची सखोल चौकशी करुन सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कोल्हारे ग्रामपंचायतीचे पुर्ण दप्तर तपासणी करावी, असादी मागण्यांसाठी विजय हजारे हे अमरण उपोषणाला बसले होते.
Exit mobile version