विनापरवाना व्यवसायीकांवर कारवाईची मागणी

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

मुरुड समुद्रकिनार्‍याजवळील अनधिकृत व्यवसाय करणार्‍यांवर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा आमरण उपोषणाला बसू, असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने मुरुड जंजिरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना रितसर निवेदनाद्वारे देण्यात आले.

निवेदनात असे म्हटले की, अनधिकृत व्यवसाय करणारे बिंधास्त पणे शासनाची फसवणूक करुन, महसूल बुडवून, रस्त्याच्या दोन्ही बाजूला विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. यामुळे स्थानिकांना व पर्यटकांना रहदारीस अडथळा निर्माण होतो. याठिकाणी मोठा अनर्थ घडु नये याकरिता पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने अनधिकृत व्यवसाय करणार्‍यांवरती कारवाई करावी. या करिता मुरुड जंजिरा नगरपरिषद कार्यालयात अनेक पत्रव्यवहार केले. परंतु, यावर अजुन सुध्दा अनधिकृत व्यवसायधारकांवरती नगरपरिषदेमार्फत कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नगरपरिषदेने अनधिकृत व्यवसाय करणार्‍यांवरती लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा नाईलाजास्तव निवडणूक आचारसंहीता संपल्यानंतर दोन दिवसांनी नगरपरिषद प्रांगणात साखळी उपोषणद्वारे आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाच्यावतीने देण्यात आला.

Exit mobile version