अवैध पार्किंग केल्यास कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।

आशिया खंडातील सर्वात मोठे स्टील मार्केट म्हणून कळंबोली स्टील मार्केटची ओळख आहे. मात्र, याच परिसरात होत असलेल्या अवजड वाहनांच्या अवैध पार्किंगमुळे मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या अनुषंगाने मंगळवारी (दि.25) नवी मुंबई वाहतुक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या आदेशानुसार कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग साठे यांनी बीमा कॉम्प्लेक्स, स्टील मार्केट येथे स्टील मार्केटमधील ट्रक, कंटेनर, ट्रेलर, मिक्सर आदि अवजड वाहनचालकांची बैठक घेतली. यावेळी स्टील मार्केटमधील पार्किंगच्या गंभीर समस्येबाबत वाहनचालकांना सूचना देण्यात आल्या. या धर्तीवर वाहन पार्किंग करताना एकेरी पार्किंग व्यतिरिक्त इतरत्र रोडवर कुठेही आपली वाहने पार्किंग करणार नाहीत याबाबत कळंबोली वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना सक्त ताकीद दिली. तसेच, असे करताना कोणी आढळून आल्यास वाहनांवर गंभीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Exit mobile version