संपकरी एसटी कर्मचार्‍यांवर कारवाई सुरु

मुंबई | प्रतिनिधी |
संपकरी एसटी कर्मचार्‍यांवर आता महामंडळाने कारवाई सुरु केलेली आहे.आजपासून बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला असून, कायमस्वरुपी कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस देण्यास सुरूवात केली आहे. सोमवारपर्यंत कामावरती हजर राहा नाही तर कठोर कारवाईला सामोरे जावा लागणार असल्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला होता. त्यानंतर देखील कामगार कामावर हजर राहिले नाही त्यानंतर राज्य सरकारने कारवाईला सुरूवात केली आहे.
परिवहन मंत्र्यांनी कर्मचार्‍यांना सोमवारपर्यंत सेवेवर हजर होण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर अनेक कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत, त्यांना आता कारणे दाखवा नोटीस आजपासून महामंडळाच्या वतीने बजावण्यात आली आहे. या कारणे दाखवा नोटीसीला उत्तर देण्यासाठी सात किंवा पंधरा दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. कारणे दाखवे नोटीशीनंतर तीन सुनावणी होतात, त्यात जर दोषी आढळले तर बडतर्फीची नोटीस पाठवण्यात येणार आहे. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी पुन्हा सात दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. त्यानंतर बडतर्फीची कारवाई केली जाईल.

Exit mobile version