बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

दोन दिवसांत साडेतीन लाखांची दंडवसुली

| अलिबाग | वार्ताहर |

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर रविवारी व सोमवारी अशी दोन दिवस वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडून तीन लाख लाख 64 हजार 600 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

चालकाने नियमाचे पालन न करता वाहन चालविल्यास वाहतूक कोंडी, अपघात होण्याबरोबरच पादचाऱ्यांनादेखील त्याचा फटका बसण्याची भीती असते. जिल्ह्यात बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने रविवारी राष्ट्रीय महामार्गासह राज्य, जिल्हा मार्गावर वाहतूक पोलीस तैनात केले होते. यावेळी येणाऱ्या वाहनांची तपासणी केली. त्यामध्ये वाहन वेगात चालविणे, ट्रिपल सीट असणे, विनापरवाना वाहन चालविणे, ज्यादा प्रवासी वाहतूक करणे, आदी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 576 वाहन चालकांविरोधात कारवाई केली. रविवारी 385 जणांविरोधात कारवाई करून दोन लाख 52 हजार 500 रुपये, तर सोमवारी 191 चालकांविरोधात कारवाई करून एक लाख 12 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

Exit mobile version