एपीएमसीतील हुक्का पार्लरवर कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।
एपीएमसी सेक्टर-19 मधील रंग दे बसंती या रेस्टारंटमध्ये बेकायदेशीररीत्या सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने शनिवारी मध्यरात्री छापा मारुन सदर रेस्टारंटमध्ये हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या 4 महिलांसह 35 ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य व तंबाखुजन्य पदार्थ जफ्त करुन हुक्का पार्लरचे चालक मालक व वेटर अशा 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हुक्का पार्लर चालविण्यास बंदी असताना तसेच रेस्टारंट, बार व इतर आस्थापना सुरु ठेवण्यासंदर्भात वेळेची मर्यादा असताना, सदरचे हुक्का पार्लर मध्यरात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यात आले होते. सदर रेस्टॉरंटच्या बेसमेंटमध्ये 4 महिलांसह 35 ग्राहक त्याठिकाणी हुक्का ओढत बसल्याचे तसेच तंबाखुजन्य पदार्थाचा धुरकट वास व धुर पसरल्याचे आढळुन आले. त्यानंतर पोलिसांनी सदर हुक्का पार्लरचा चालक गणेश अशोक साळवे (42) तसेच वेटर हरेकृष्ण दास, अफताब अहमद, सलमान हुसेन, कासिम शेख ज्वेल रशीद या सहा जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.

Exit mobile version