| नवी मुंबई । वार्ताहर ।
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील घणसोली विभाग कार्यालयांतर्गत असणार्या पालिकेच्या मासळी मार्केटबाहेर बेकायदा 20 ते 25 विक्रेत्यांनी बस्तान मांडले होते. या विक्रेत्यांमुळे पादचार्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता. नागरिकांना चालणेही जिकिरीचे झाले होते. त्यामुळे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शुक्रवारी (ता.11) सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. कारवाईच्या वेळी मासळी विक्रेत्यांकडून विरोध करण्यात आला. पालिका व मासळी विक्रेते हे आमने सामने आले होते; पण पोलिस बंदोबस्तात विक्रेत्यांवर कारवाई केली. नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार घणसोली अतिक्रमण उपआयुक्त अमरीश पटनीगिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अधिकारी शंकर खाडे यांच्या सहकार्याने अतिक्रमण विभागाचे प्रमुख रोहित ठाकरे, अधीक्षक संतोष शिलाम, वरिष्ठ लिपिक विष्णू धनावडे यांनी कारवाई केली. या कारवाईमुळे मासळी विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.