रायगडात मटका जुगारांच्या अड्ड्यांवर कारवाई

। अलिबाग । वार्ताहर ।
रायगडमध्ये नागाव, हटाळे, साळाव व कर्जत येथे मटका जुगारांच्या अड्ड्यांवर कारवाई केली असून मुद्देमाल जप्त केला आहे. नागाव, नवापाडा येथे आरोपी रा.नागाव याने लोकांकडुन विनापरवाना पैसे स्वीकारून कल्याण मेन नावाचा मटका जुगार चालवताना सापडला असून सदर गुन्ह्यातील 1 हजार एकशे सत्त्याहत्तर रुपये किमतीचे साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे. तसेच कर्जत येथे सातशे रूपये तर, अलिबाग येथे 1 हजार पाचशे बावन्न रूपये व साळाव येथे दोनशे सदुसष्ठ रूपये किमतीचा मटका जुगाराचे साहित्य व रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केले आहे. याबाबत सदरच्या पोलीस ठाण्यांमध्ये गन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Exit mobile version