। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
तालुक्यातील फणसवळे-सदाफळवाडी येथे बेकायदा स्वरूपात गावठी- हातभट्टीची 460 रूपये किमतीची एकूण 8 लिटर दारू विक्रीसाठी बागळल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी सत्यवान गिरीधर पोमेंडकर (48) या संशयित प्रौढावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई प्रतिक कांबळे यांनी तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
गावठी दारू विक्रीप्रकरणी कारवाई
