माणगांवमधील दुकानांवर कारवाई

नगरपंचायतीने केली चार दुकाने सिल
। माणगाव । प्रतिनिधी ।
कोरोनाच्या महामारीची दोन महिन्यांपासून दुसरी लाट आली असून माणगाव तालुक्यासहित शहरात दररोज कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. महामारीला आळा घालण्याकरिता शासनाने अनेक नियम तयार केले असून निर्बंध घातले आहेत. परंतु शहरातील काही व्यापारी नियमांचे पालन करीत नसल्याने समजल्यानंतर माणगाव नगरपंचायतीने धडक कारवाईला सुरुवात करून चार दुकाने सिल केली तर काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राहुल इंगळे व त्यांचे सहकारी कर्मचारी मंगेश पाटील, रामदास पवार व इतर कर्मचार्‍यांनी माणगाव शहरात फिरून जुन्या बस स्थानकाच्या जवळील श्री जसोल किराणा दुकान, एक फळ विक्रेता, महामार्गावरील सिगरेट, विडी, तंबाखू दुकान, नाकोडा स्टील इत्यादी दुकाने शासनाच्या नियमांचे पालन करीत नसल्याने सापडल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केल्यामुळे माणगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version