अनधिकृत पार्किंगवर कारवाई

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण-पनवेल महामार्गावरील उरण, दास्तानफाटा, चिर्ले, धुतुम व जासई येथील शंकर मंदिर परिसरात उरण वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गलांडे यांच्या पथकाने रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभ्या असलेल्या अवजड ट्रेलर पार्किंगला आळा घालण्यासाठी दंडात्मक कारवाईचा धडाका लावला आहे. मागील सहा महिन्यांच्या कालावधीत उरण वाहतूक पोलिसांनी 7 हजार 389 अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याचप्रमाणे माहामार्गांवर अवजड वाहने पार्किंग न करण्याचे आवाहनही अवजड चालक मालकांना करण्यात आले आहे.

तर न्हावाशेवा वाहतूक पोलिसांच्या हद्दीत रोडवर बेकायदेशीर पार्किंग होणाऱ्या वाहनांवर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जी.एम.मुजावर यांच्या वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली असून, ट्रान्सपोर्ट चालक व मालक यांनी आपली वाहने रस्त्यावर उभी न करता जेएनपीएने बनविलेल्या पार्किंगमध्ये उभी करावी, असे आवाहन मुजावर यांनी केले आहे. तसेच, यापुढे कोणीही अवजड वाहने रस्त्यावर उभी करून ठेवल्यास सदर वाहनांवर कायदेशीर दांडात्मक कारवाई केली जाईल असेबजावले आहे.

Exit mobile version