नवीन पनवेलमध्ये वाहनांवर कारवाई

पनवेल शहर वाहतूक विभागातर्फे मोहीम
। पनवेल । वार्ताहर ।
नवीन पनवेल येथे रेल्वे स्थानकाबाहेर नो पार्किंग, फुटपाथवर वाहने पार्किंग करणार्‍या तसेच सम विषम पार्किंगच्या नियमाचे उल्लंघन करणार्‍या शंभराहून अधिक वाहनांवर पनवेल शहर वाहतूक विभागाच्यावतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला. नवीन पनवेल येथील बिकानेर स्वीट समोरील परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात वाहतूक विभागाच्या वतीने विशेष मोहीम घेण्यात आली.
यावेळी नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या सूचनेनुसार पनवेल शहर वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक संजय नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष म्हात्रे, पोलीस नाईक प्रवीण अहिरे, महिला पोलीस नाईक वैशाली कोकाटे, पोलीस शिपाई राठोड, महिला पोलीस शिपाई साधना पवार यांच्यासह वाहतूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version