भरधाव स्विफ्ट कारवर कारवाई

| रेवदंडा | प्रतिनिधी |

रेवदंडा बाजारपेठेतून भरधाव वेगाने स्विफ्ट कार चालवित नेत असलेल्या वाहन चालकांवर रेवदंडा पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. रेवदंडा येथे बुधवारी, (दि.13) आराध्य दैवत मारूतीरायांचा पालखी उत्सव साजरा करण्यात येत असताना, दुपारी दुपारी 12.30 चे सुमारास बाजारपेठेतून पालखी मिरवणुकीतील भाविकांचा उपस्थितांच्या सुरक्षितेची पर्वा न करता, काळ्या रंगाची फिल्म बसवलेली स्विफ्ट कार वाहन चालकांनी भरधाव वेगाने चालवित नेली. ही बाब रेवदंडा पोलिसांचे लक्षात येताच, एएसआय एम.एन. खोत व एस.ए. गव्हाणे यांनी भरधाव स्विफ्ट कारचा पाठलाग करून चालकास ताब्यात घेतले. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदी येथील राहणार वाहन चालक प्रतिक बाळासाहेब भालेराव याच्याविरोधात रेवदंडा पोलिसांनी कारवाई करून त्याच्यावर 5250 रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

Exit mobile version