प्लॅस्टिक पिशवीचा वापर करणार्‍यांवर कर्जत मुख्याधिकार्‍यांची कारवाई

। कर्जत । वार्ताहर ।
प्लॅस्टिक पिशव्यांवर शासनाने बंदी घातली आहे, तरी अजून काही व्यापारी, नागरिक राजरोसपणे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करीत आहेत. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणार्‍यांवर कर्जत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.
कर्जत शहरात प्लॅस्टिक बंदी काटेकोरपणे पाळली जात असून, त्याची अंमलबजावणी करीत असताना नियम मोडणारे यांच्याविरुद्ध कडक कारवाई केली जात आहे. दि.11 फेब्रुवारी रोजी शुक्रवारचा बाजार भरला होता. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी सर्व कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन सायंकाळी मुख्य बाजारपेठेत पाहणी केली. जे व्यापारी अजून ग्राहकांना प्लॅस्टिक पिशवी देतात, अशा तीन व्यापार्‍यांवर प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे दंडात्मक कारवाई केली. मुख्याधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शखाली अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, मनीष गायकवाड, लक्ष्मण माने, सुदाम म्हसे, सुनील लाड आदी कर्मचारी सहभागी होते.

पथक फिरते राहणार आहे, जे कोणी प्लॅस्टिक पिशवीचा वापर करतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. – डॉ. पंकज पाटील, मुख्याधिकारी

Exit mobile version