खोपोली नगरपरिषदेतर्फे कारवाईचा बडगा

नियमांची काटेकोर अंमलबजवणी होणार
। खोपोली । प्रतिनिधी ।
कोरोना आणि त्याच्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज झाले असून, आता खोपोली नगरपरिषद प्रशासनानेही कोरोनाविषयक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कंबर कसली आहे.
यानुसार आरोग्यविषयक नियमांची पायमल्ली करण्यार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उगारण्यात आला आहे.
राज्यावर पुन्हा एकदा कोरोना संकटांची टांगती तलवार लटकू लागली असून, आगामी काळात हे संकट अधिक तीव्र होण्याचे संकेत आरोग्यसंस्थांनी दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर खोपोली शहरात जे नागरिक शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन करतील अशांवर कारवाई करण्यासाठी मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर बांदीवडेरक, विठोबा म्हात्रे, गुणाजी गायकवाड, विजय वाघमारे, अक्षय वाणी, विशाल गोयल, रुपाली कांबळे, अक्षय जाधव, रोहिदास कांबळे, प्रेम सोनावणे, प्रदीप गायकवाड असे दंड वसूली पथक नियुक्त करण्यात आले आहे.
या पथकामार्फत गेल्या 10 दिवसांत 120 पेक्षा अधिक नागरिक तथा व्यापारी यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, साधारणतः 70 हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

Exit mobile version