| तळा | वार्ताहर |
तालुक्यातील तारणे येथे बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने काहीच दिवसांपूर्वी एकास अटक केले होते. त्या पाठोपाठ निगुडशेत येथे तळा पोलिसांनी दोघांवर कारवाई केल्याची घटना घडली असून, यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याचे समजते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, निगुडशेत येथे आरोपी पांडुरंग बालोजी मंचेकर (22) व प्रतिक देवजी सरफळे (16) या दोघांकडे प्रत्येकी दहा हजार रुपये किमतीच्या दोन ठासणीच्या बंदुका व त्यासाठी लागणारे साहित्य हे विनापरवाना व बेकायदेशीररित्या गुरांच्या गोठ्यात आढळून आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. हे दोन्ही आरोपी बंदुकीचा वापर कशासाठी करीत होते, हे मात्र कळू शकलेले नाही.याबाबत दोन्ही आरोपींवर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड हे करीत आहेत.