| पनवेल | वार्ताहर |
खारघर वसाहत परिसरात बेकायदा विना परवाना दारु विक्री केल्याप्रकरणी दोघा जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. कोपरा येथील एका घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती खारघर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी 40 लिटर गावठी हातभट्टीची दारू ट्यूबमध्ये सापडून आली. तसेच खारघर वसाहतीमधील धनश्री किराणा स्टोअर सेक्टर 13, खारघर या ठिकाणी देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखा, नवी मुंबई यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी विविध प्रकारचे मदय सापडून आले. यावेळी दारू विक्रीचा परवाना नसल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.