| महाड | प्रतिनिधी |
राज्यात विनापरवाना वाळू उत्खनन करणे, त्याचबरोबर गौण खनिजाचे अनधिकृत वाळूच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी शासनाने नवीन परिपत्रक काढले आहे. यानुसार ही कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
राज्यात अनधिकृत वाळू आणि गौण खनिज उत्खनन वाढले असतानाच या तस्करांकडून कारवाईला जाणाऱ्या अधिकाऱ्यावर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने आता नवीन परिपत्रक काढून अनधिकृत वाळू उत्खनन आणि गौण खनिज उत्खनन वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यामुळे यापुढे वाळूबाबत अनधिकृत उद्योग करणाऱ्यांना वाळू तस्कर म्हणून संबोधले जाणार आहे. तसेच गौण खनिजाचे अवैध उत्खनन वापर वाहतूक व तस्करी करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास अथवा दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासात पोलीस व महसूल यंत्रणेमधील तसेच संबंधित सक्षम यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचारी यांनी हलगर्जीपणा अथवा कसुरी केल्यास ते निदर्शनास आल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात संबंधित जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त यांनी कारवाई करावी, असे स्पष्ट प्रतिज्ञापत्रात म्हटल्याचे वाळूतस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.







