कुडली शाळेत कृतीदायी मार्गदर्शन

| सुतारवाडी | वार्ताहर |

रायगड जिल्हा परिषद शाळा कुडली येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मुख्याध्यापिका सुशीला म्हात्रे यांनी सविस्तर मार्गदर्शन करताना सांगीतले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगी सदगुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी जाणता राजा म्हणून त्यांची ख्याती होती. मुघलशाही, आदिलशाही, निजामशाही यांच्या जाचाला प्रजा त्रासली होती. या अन्याया विरुद्ध शिवरायांनी लढा दिला. जिजामाता शिवरायांच्या पहिल्या शिक्षिका होत. मासाहेब जिजाऊ होत्या म्हणून शिवाजीराजे घडले व त्यांनी हिंदवीस्वराज्य निर्माण केले. असे विद्यार्थ्यांना प्रेरणा व कृतीदायी मार्गदर्शन केले.

Exit mobile version