महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
| वाघ्रण | प्रतिनिधी |
शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचारात सर्व कार्यकर्ते प्रचारात आघाडीवर असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, आपचे कार्यकर्ते जोरदार प्रचार करीत आहेत. त्यामुळे सर्व ठिकाणी चिऊताईंच्या नावाचा बोलबाला दिसून येत आहे.
शहापूर मतदारसंघात चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांच्या अनेक सभा झाल्या असून, कार्यकर्ते स्थानिक प्रचारात आघाडीवर असल्याचे गावागावात पाहायला मिळत आहेत. आपली निशाणी शिट्टी असून, चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांच्या नावासमोरचे तीन नंबरचे बटण दाबा आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असा प्रचार करीत कार्यकर्ते मतदारांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत. या प्रचारात पुरुषांबरोबर मोठ्या संख्येने महिला आणि युवादेखील सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातील डावली, रांजणखार, सारळ, रेवस, हाशिवरे, मानकुळे, शिरवली, नारंगी, चिंचवली, पेढांबे, वाघ्रण, कामार्ले, खिडकी, चरी, कुरकुंडी आणि शहापूर ग्रामपंचायतीमध्ये शेकाप नेते जयंत पाटील, पंडित पाटील, माजी राज्यमंत्री स्व. मीनाक्षी पाटील, जि.प. सदस्या भावना पाटील यांनी असंख्य विकासकामे केली असून, त्याचा फायदा निश्चित चिऊताई यांना होईल, असा आत्मविश्वास कार्यकर्ते प्रचारादरम्यान व्यक्त करीत आहेत.
या मतदारसंघाला विजयाचा वारसा असून, चित्रलेखा पाटील यांनी घेतलेल्या सभांमधून साधलेला संवाद नक्कीच विजयामध्ये भर टाकण्याचे काम करील, अशी चर्चा गावागावात निघालेल्या प्रचार रॅलीमधून अनेक जाणकार बोलताना दिसत आहेत. हा मतदारसंघ चिऊताईसाठी पूर्णपणे सज्ज असून, सारेजण काम करीत असल्याचे चित्र तयार होताना दिवसेंदिवस तासागणित सकारात्मक होताना आणि प्रचारात मुसंडी मारताना पहायला मिळत आहे. त्याचबरोबर चित्रलेखा उर्फ चिऊताई या विजयी होणारच, असा दावा कार्यकर्ते करीत आहेत.