चौलमळ्याच्या आई कृष्णादेवीला घातले साकडे
। चौल । प्रतिनिधी ।
अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा महाविकास आघाडीच्या पुरस्कृत शेकाप उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई यांच्या प्रचाराचा गावोगावी जोरदार धडाका सुरू आहे. चौल विभागातदेखील चिऊताईंच्या प्रचाराचा झंझावात सुरू असून, शनिवारी (दि. 16) चौलमळा येथील कृष्णादेवी मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी चिऊताईंच्या विजयासाठी उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आई कृष्णादेवीला साकडे घातले.
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात गावदेवीच्या आशीर्वादाने करण्यात येते. त्याचप्रमाणे भक्तांच्या हाकेला धावणारी, नवसाला पावणारी अशी ख्याती असणार्या चौलमळा गावची ग्रामदेवता आई कृष्णादेवीचे आशीर्वाद घेऊन चित्रलेखा पाटील यांच्या प्रचाराची सुरूवात शनिवारी करण्यात आली. प्रारंभी चौलमळा गावचे प्रमुख रवींद्र घरत यांच्या हस्ते आई कृष्णादेवीची पूजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी चौल ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच रुपाली म्हात्रे, चौलमळा गावचे माजी उपप्रमुख नंदकुमार म्हात्रे, युवक मंडळ अध्यक्ष महेंद्र नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते किशोर घरत, आर.डी. नाईक सर, जयंत नाईक, ग्रा.पं.चे माजी सदस्य शशिकांत म्हात्रे आदींसह गावच्या ज्येष्ठ नागरिकांनीसुद्धा प्रचाराचा नारळ फोडून चिऊताईंच्या विजयासाठी कृष्णादेवीला गार्हाणे घातले.
चौलमळा गावातील प्रचारासाठी मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गावातील प्रत्येक मतदारापर्यंत जाऊन चिऊताईंच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. दरम्यान, कार्यकर्त्यांकडून चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या तीन नंबरच्या शिट्टी समोरील बटण दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदारांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.
या प्रचारात शेतकरी कमागार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजय ठाकूर, जयंत नाईक, काशिनाथ घरत, राजेंद्र ठाकूर, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते दत्तात्रेय काठे, शिवसेनेचे विभाग प्रमुख मारुती भगत, मोहन ठाकूर, संस्कृती म्हात्रे, चौल ग्रा.पं. माजी सदस्य निलेश म्हात्रे, माधवी टेकाळकर, रमेश म्हात्रे, दिपक लाड, शैलेश नाईक, सिद्धेश लोहार, राजेंद्र पाटील, जितेंद्र पाटील, बाळकृष्ण पाटील, सुरेश खडपे, प्रशांत आमरे, मनिष नाईक, महेंद्र घरत, वैभव चोगले, अस्मिता पाटील, हर्षदा नाईक, म्हात्रे मॅडम, मनिषा घरत आदी उपस्थित होते.







