माणगावमध्ये ‌उपक्रम उत्साहात साजरे

| माणगाव | प्रतिनिधी |

महसूल व वन विभागाकडील शासन निर्णयानुसार महसूल विभागामार्फत राज्यात सर्वत्र ‘महसूल पंधरवडा उपक्रम’ साजरा करण्याचे निर्देश प्राप्त झाले आहेत. रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली व माणगाव तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या सूचनेनुसार माणगाव तहसील कार्यालय येथेही या पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला.

त्यानुसार माणगाव तहसील कार्यालयात तालुक्याचे उपविभागीय अधिकारी संदीपान सानप यांच्या सूचनेनुसार व अध्यक्षतेखाली तसेच माणगाव तहसीलदार दशरथ काळे यांच्या अधिपत्याखाली ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाअंतर्गत बाईक रॅली काढण्यात आली.

महसूल विभाग अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या महसूल पंधरवड्यामध्ये सैनिक हो तुमच्यासाठी हा उपक्रम उपविभागीय माणगाव डॉ.संदीपान सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय माणगावच्या सभागृहात राबविण्यात आला. यावेळी माणगाव तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणगाव, तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार यांच्यासह सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. माणगाव तालुक्यातील वीर पत्नी, वीर माता तसेच माजी सैनिक याना या कार्यक्रमास विशेष आमंत्रित करण्यात आले होते. वीर यशवंतराव घाडगे माजी सैनिक संघटना माणगावचे अध्यक्ष विष्णू सावंत व कार्याध्यक्ष सुरेश गायकवाड हे यावेळी उपस्थित होते.तहसीलदार दशरथ काळे यांच्या हस्ते व्हिक्टोरिया क्रॉस विजेते शाहिद वीर यशवंतराव घाडगे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून सदर उपक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात वीर माता, वीर पत्नी तसेच माजी सैनिक यांचा त्यांच्या कार्याबद्दल यथोचित सन्मान करण्यात आला.

Exit mobile version