अभिनेता गोविंदा शिवसेनेत

| मुंबई | प्रतिनिधी ।

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत बॉलिवूड अभिनेता गोविंदा अहुजा यांनी पक्षप्रवेश केला. गोविंदा शिवसेनेत पक्षप्रवेश करणार, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर ही चर्चा खरी ठरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. मुंबईच्या नरिमन पॉईंट येथे शिवसेनेच्या बाळासाहेब भवन या कार्यालयात गुरुवारी (दि.28) गोविंदा यांनी शिवेसनेचा झेंडा आपल्या हाती घेतला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं स्वागत केलं. यावेळी गोविंदाने आपली भूमिका मांडली.

Exit mobile version