ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन

| मुंबई | प्रतिनिधी |
मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे निधन झाले आहे. ते 93 वर्षांचे होते. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव अजिंक्य देव यांनी याबाबत माहिती दिली आहे. रमेश देव यांचा जन्म अमरावतीत झाला. त्यांचे मोठे आजोबा अभियंता होते आणि वडील कोल्हापुरात न्यायाधीश होते.

रमेश देव १९५१ मध्ये बालकलाकार म्हणून “पाटलाची पोर” चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी ‘सीमा देव’ या नामांकित अभिनेत्रीशी विवाह केला. या त्यांना अजिंक्य आणि अभिनय हे दोन मुलगे आहेत.

सीमा आणि रमेशने पती, पत्नी आणि प्रेमी म्हणून अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. देव यांनी “आंधळा मागतो एक डोळा” (१९५६) चित्रपटातून त्यांनी खऱ्या अर्थाने पदार्पण केले. तर त्यांचा बॉलिवूडचा पहिला चित्रपट होता “आरती”. दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्य लक्ष्मी’ या चित्रपटांत काम केले.

“दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका केली होती. देव यांना ‘मुजर्मि’, ‘खिलोना’ आणि ‘जीवन मृत्यु’ या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली. “कोरा कागज” आणि “आखा दाव” चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ‘खुशी-दर’ (१९८२) चित्रपटात रामनाथनची भूमिका साकारली होती. त्यांचे पुढचे सिनेमे “औलाद” आणि “घायल” होते. कौल साहबच्या रूपात २०१३ मध्ये “जॉली एलएलबी” चित्रपटात काम केले होते. 2016 मध्ये त्यांनी ‘घायल वन्स अगेन’ चित्रपटात काम केले होते. देव २५० पेक्षा जास्त चित्रपटांचा भाग होते.

Exit mobile version