अभिनेते ऋतुराज सिंग यांचे निधन

| मुंबई | वृत्तसंस्था |

‘अनुपमा’ फेम प्रसिद्ध अभिनेते ऋतुराज सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 59 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

अनेक टेलिव्हिजन मालिकेत त्यांनी काम केले होते. अपनी बात, ज्योति, हिटलर दीदी, शपथ, वॉरियर हाय, आहट और अदालत, दीया और बाती हम यांसारख्या अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केले. दरम्यान, अचानक ऋतुराज सिंग यांच्या निधनाची बातमी समोर आल्यामुळे चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज सिंग यांच्या निधनानंतर लिब्रिटी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. अनेक टेलिव्हिजन मालिकेत देखील त्यांनी काम केले होते. सिनेसृष्टीतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

Exit mobile version