अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी केली आत्महत्या

। मुंबई । प्रतिनिधी ।

चित्रपटसृष्टीसाठी एक अतिशय धक्कादायक बातमी आहे. अभिनेत्री मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा यांचे वडील अनिल अरोरा यांनी मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. हि घटना बुधवारी (दि. 11) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अनिल अरोरा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नाही.

Exit mobile version