नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आपल्या हटक्या अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सिक्री गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना 2020 मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत होती. शुक्रवारी सकाळी हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. सुरेखा सिक्री यांनी 1978 मध्ये सिनेसृष्टीत ’किस्सा कुर्सी का’ मधून पदार्पन केले होते. त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. बालिका वधू मालिकेतील त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते.