जलाशय प्लास्टिक व निर्माल्य मुक्तीचा संकल्प
। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल वेस्ट वारियर्सनी जनजागृती करण्यासाठी आदई हिरवाई ग्रुप, सीकेटी एनसीसी, क्रियेट टुगेटर फाऊडेंशन, पतंजली योग ग्रुप, रोबिनहुड आर्मी, रोटरेक्ट व रोटरी क्लब ऑफ पनवेल, संकल्प फाउंडेशन, सिंधुदुर्ग रहिवाशी संघ एकत्रित येऊन आदई तलाव लोकसहभागातून स्वच्छ करण्याचे काम नोव्हेंबर 2021 पासून हातात घेतले आहे. यामाध्यमातून तलावाची जैवविविधता नैसर्गिकरित्या टिकवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
नवीन पनवेल-आदई येथील तलावात मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक, त्याचबरोबर निर्माल्याचे साम्राज्य असल्याने एक प्रकारे जलप्रदूषण होत होते. त्याचबरोबर या जलाशयाचे सौंदर्य सुद्धा हरपत चालले होते. लोकांच्या प्रचंड प्रयत्नांमुळे व त्यांनी केलेल्या जनजागृतीमूळे पनवेल महानगरपालिका स्वत:हून मदतीला आली. सिडकोच्या अधिकार्यांनी तातडीने तलावावर निर्माल्य कलश बसवून सहकार्य केले. या सर्व कामात पनवेल महानगरपालिकेच्या अधिकर्यांनी पनवेल वेस्ट वॉरियर्सना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केले.
स्वच्छता ड्राईव्ह निमीत्त मुलांकडून चित्रे व पोस्टर्स बनवून घेतली गेली. चिमुरड्यांनी फलकांच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न केला. पुढील पीढीवर श्रम व पर्यावरण जतानाचे संस्कार करण्याचा प्रयत्न पनवेल वेस्ट वॉरियर्सनी केला. शालेय विद्यार्थ्यांनीही आदई तलाव स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवला. त्यांनी स्वच्छता आणि पर्यावरण विषय फलक हातात घेऊन समाजाला एक वेगळा संदेश दिला.
आदई तलाव लोकसहभागातून स्वच्छ
