कर्तृत्ववान ठेकेदारांचा सन्मान
| अलिबाग | प्रतिनिधी |
अदानी सिमेंट ग्रुप (आंबुजा व एसीसी सिमेंट) च्या वतीने अलिबागमधील वेश्वी येथील मॅपल आयव्ही हॉटेलच्या सभागृहात मंगळवारी (दि.24) सायंकाळी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या निमित्ताने अलिबाग व मुरूडमधील कर्तृत्ववान ठेकेदारांचा सन्मान करण्यात आला.
अदानी सिमेंट ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी गजेंद्र गोडले, चंद्रन पटेल, रवि यादव, दिनेश पतंगराव या मान्यवरांसह मुरूड व अलिबागमधील अदानी ग्रुपची टीम, ठेकेदार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी अदानी ग्रुपच्या सिमेंटची माहिती देण्यात आली. त्यानंतर बांधकामासह ग्राहकांना सेवा देण्याविषयी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यात मोठमोठे प्रकल्प होत आहेत. वेगवेगळ्या इमारती बांधल्या जात आहेत. ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी सर्वांचे योगदान चांगल्या पध्दतीने राहिले आहे. अदानी ग्रुप सिमेंटसह आंबुजा आणी एसीसी सिमेंटची सेवा अधिक सक्षम करण्यासाठी सर्वांनी मेहनत घेणे गरजेचे आहे. ग्राहकांना दर्जेदार सिमेंट मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी ग्राहकांपर्यंत अधिक पोहचण्याचा प्रयत्न करा. सिमेंटच्या उत्पादनाचा चांगला उपयोग, गुणवत्ता नियंत्रण व ग्राहकांच्या आनंदामध्ये राहिल याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मान्यवरांनी ठेकेदारांना सांगितले.







