राजेश मोरे, चंद्रकांत सावंत यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

। तळा । वार्ताहर ।
रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातुन जिल्ह्यातील प्रगत आणि शेतीनिष्ठ शेतकर्‍यांचा सन्मान त्यांच्याच शेताच्या बांधावर जाऊन दरवर्षी केला जातो. रायगड प्रेस क्लब, तळा शाखेच्या वतीने कडसांबळे येथील राजेश मोरे व बेलघर येथील चंद्रकांत सावंत यांना आदर्श शेतकरी पुरस्कार मंगळवारी (दि.27) देण्यात आला. यावेळी तहसीलदार कनशेट्टी, नायब तहसीलदार, कृषी अधिकारी आनंद कांबळे, कृषी मंडळ अधिकारी सागर वाडकर, संजय रिकामे, किशोर पितळे, डी.टी आंबेगावेसर, पुरुषोत्तम मुळे, विराज टीळक, भास्कर गोळे, महम्मद परदेशी, महेंद्र कजबजे, दिनेश गायकर, कैलास पायगुडे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरूषोत्तम मुळे यांनी केले तर आभार संजय रिकामे यांनी मानले.

Exit mobile version