। उरण । वार्ताहर ।
महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय सेवासन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 हा पुरस्कार उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सध्या सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील विद्यासंकुलात अध्यापनाचे कार्य करत असणारे शिक्षक मनोज पाटील यांना प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार पुणे-भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात सिने अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, शिक्षक आ.विक्रम काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मनोज पाटील यांनी यांनी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या पेण तालुक्यातील रावे येथील माध्यमिक शाळेत 1996 मध्ये आपल्या अध्यापण कार्याला सुरूवात केली होती. अध्यापनाबरोबरच तेथे त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्नशील राहीले आहेत. जानेवारी 2014 मध्ये ते सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुलात कार्यास सुरूवात केली.
शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी आपल्या महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा व पर्यावरण क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळेचे प्रा.राजेंद्र पालवे, उपप्राचार्या सरोज पाटील, महाराष्ट्र शिक्षक पॅनल रायगड विभाग प्रमुख सुरेश शिंदे, शिक्षक कर्मचारी वर्गाने शिक्षक मनोज पाटील यांचे अभिनंदन केले आहे.
