वैशाली पाटील यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

। खरोशी । वार्ताहर ।
वावोशी केंद्रातील अजिवली वनवठे येथील रायगड जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमशील मनमिळाऊ आणि आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भरीव कार्य करणार्‍या शिक्षिका वैशाली पाटील यांना वावोशी केंद्राचा आदर्श शिक्षिका पुरस्कार 23 ऑक्टोबर रोजी देण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे शिवव्याख्याते प्रशांत देशमुख, केंद्रप्रमुख मनोहर म्हात्रे, सल्लागार समितीचे अध्यक्ष सीताराम पाटील, उपाध्यक्ष अनंत हिरवे, कमल जाधव, गिरीधर पिंगळे गुरुजी, अरुणा मोरे, ग्रामपंचायत सदस्य नितीन कदम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा छाया कदम, उपाध्यक्ष सर्व सदस्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिक्षक संदीप पाटील, मीनाक्षी पाटील यांच्यसह विद्यार्थी जिया कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका वैशाली नाचण, ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ विद्यार्थी, अंगणवाडी सेविका आदी सर्व वावोशी केंद्रातील सर्व शिक्षकांनी मोलाचे योगदान दिले. सूत्रसंचालन सचिन केदारे यांनी केले.

Exit mobile version