वेळेसह मजुरीच्या खर्चात बचत
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हुमगाव गावातील पाच शेतकऱ्यांनी आधुनिक यंत्राच्या सहाय्याने भाताची शेती केली आहे. उन्हाळी शेती करताना या गावातील 11 शेतकऱ्यांनी सांघिक आणि सेंद्रिय पद्धतीने भाताची शेती केली होती. दरम्यान, येथील शेतकऱ्यांनी केलेल्या शेतीची पाहणी जिल्ह्याचे कृषी अधीक्षक यांनी केली.
या गावाच्या परिसरातून राजनाला कालवा वाहात असूनश् त्या भागातील शेतकरी दुबार शेती करीत असतात. त्या शेतकऱ्यांची चिकाटी आणि मेहनत लक्षात घेऊन कर्जत कृषी विभागाने त्यांच्याकडे समूह आणि यांत्रिक शेती करण्याचा प्रयोग साकारण्याचा निर्णय घेतला होता. त्या गावातील 11 हेक्टर जमिनीवर सांघिक शेतीमुळे या गावातील शेतकऱ्यांचे नाव रायगड जिल्ह्यात कौतुकाने घेतले जात आहे. मात्र, या गावातील शेतकऱ्यांनी सध्याच्या रग्बी हंगामात भाताची शेती करताना येथील पाच शेतकऱ्यांनी यावर्षीची आपली सर्व यांत्रिकी पद्धतीने केली आहे. त्यात भाताची रोपे तयार करण्यापासून खतांची मात्रा आणि त्या ठिकाणी जमिनीची उखळण, चिखलणी तसेच भाताची लागवड आदी सर्व कामे यांत्रिकीकरण यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
हुमगावमधील पंढरीनाथ वामन बागडे, बळीराम वामन बागडे, दिलीप भाऊ भुंडेरे, शिवाजी सिताराम बार्शी, अविनाश भाऊ भुंडेरे, प्रमोद दूंदा बार्शी रत्ना, नाथा धुंदा बागडे, लक्ष्मण जग्गू कराळे, दिनेश विठू धुळे, अरुण तुळशीराम भुंडेरे, मारुती चंदू बागडे या शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेती केली आहे. या शेतीची पाहणी रायगड जिल्ह्याच्या कृषी अधीक्षक उज्ज्वला बाणखेले, उप विभागीय कृषी अधिकारी नितीन फुलसुंदर तसेच तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी दिनेश कोळी, मंगेश गलांडे यांनी केली. या शेतीचे नियोजन कृषी सहायक रुपाली सोनाने यांच्याकडून गेली तीन महिन्यांपासून सुरु आहे.