वकीलांना केले मार्गदर्शन
। खोपोली । प्रतिनिधी ।
लोक अदालत व कायदेशीर मार्गदर्शन याकरिता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी अलिकडेच खालापूर न्यायालयास भेट दिली. दुपारच्या सत्रात खालापुर वकील बार असोसिएशनने सभेचे आयोजन केले होते. यादरम्यान वकील वर्गाने जास्तीत जास्त केसेस व दावे मध्यस्थीच्या माध्यमातून मिटवावे याबाबतही त्यांनी योग्य मार्गदर्शन केले.
सदर सभेस अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी, खालापूर दिवाणी न्यालायाचे न्यायाधीश वागळे, सह दिवाणी न्यायाधीश माने, सह दिवाणी न्यायाधीश सपकाळ मॅडम आदी उपस्थितांचे स्वागत अॅड.योगेश मानकवळे, अॅड.वसंत नामजोशी, अॅड.राजेंद्र येरुणकर, अॅड.विकास म्हात्रे यांनी केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्वामी यांनी लोक आदालत बाबत उपस्थित न्यायाधीश व सर्व वकील वर्गास सूचना व मार्गदर्शन केले. तसेच दि.12 मार्च रोजी होणार्या लोक आंदोलनामध्ये वकीलवर्गाने मोठ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढावे अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अॅड.पद्मा पाटील यांनी केले.





