गॉल्फमध्ये अदितीला रौप्य

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

आशियाई क्रीडा स्पर्धेत गॉल्फ स्पर्धेमध्ये भारताच्या अदिती अशोकने रौप्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला गॉल्फर ठरली आहे.
अंतिम सामन्यापर्यंत सातत्याने उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या अदितीला थायलंडच्या युबोल अर्पिचाया या खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला. युबोलने अदितीला हरवत सुवर्णपदक जिंकलं. दक्षिण कोरियाच्या ह्युंजो यू हिला कांस्यपदक मिळाले. दरम्यान, वुमेन्स गॉल्फ टीम इव्हेंटमध्ये भारताच्या संघाची चौथ्या स्थानावर घसरण झाली.

Exit mobile version