। नागोठणे । वार्ताहर ।
युवा सेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई मालाडचे माजी आमदार डी.एन.चौलकर यांच्या मुरुड-जंजिरा येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने ते काल मुरुड-जंजिरामध्ये आले होते.
युवा अवस्थेत डी. एन. चौलकर मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासह तत्कालीन चळवळीत मुंबई बंद हाक त्यांनी एकेकाळी संयुक्तपणे दिली होती. स्व. राजीव गांधी यांच्या पश्चात त्यावेळी सोनिया गांधी यांनी सक्रिय राजकारण न करण्याचा निर्णय केला होता. तेव्हा असंख्य इंदिरा गांधींचे समर्थक मुंबई सोडून बाहेर पडले. डी.एन.चौलकर तेव्हा मुरुड-जंजिरामध्ये परतले. रविवारी आदित्य ठाकरे, काँग्रेसचे मुंबईतील नेते भाई जगताप, रायगड जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांसह डी. एन. चौलकर यांच्या निवासस्थानी गेले. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली.