। मुंबई । प्रतिनिधी ।
दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एक जैन देरासर पाडल्याच्या विरोधात जैन बांधवांनी महापालिका विरुद्ध आंदोलन केले आहे. सध्या पालिका ही पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यालय आणि नगरविकास मंत्री यांच्या नियंत्रणात आहे. परंतु, देरासर वाचवण्याऐवजी ते केवळ नौटंकी करत आहेत. लोढा यांचे एक बेकायदेशीर कार्यालय पालिकेत आहे आणि त्यांना रिअल इस्टेटचा मोठा अनुभकही आहे. सर्वांनी हे लक्षात घ्यावे. भाजप कोणाचेही नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे.